शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:24 IST

2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता

नवी दिल्ली -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सुमारे 2 तास 39 मिनिटं त्यांनी सलगपणे अर्थसंकल्प मांडला. पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय भाषणामध्ये एक नवा विक्रम निर्मला सीतारामन यांनी निर्माण केला. भारताच्या इतिहासामधील हे सर्वात प्रदीर्घ भाषण आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे बजेट भाषण जवळपास 2 तास 39 मिनिटं चालले, हे भाषण अजून काही मिनिटे लांबले असले मात्र तत्पूर्वी भाषण वाचताना त्यांची तब्येत बिघडल्याचं दिसून आलं. यानंतर  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना भाषण संपविण्याचा सल्ला दिला त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण संपवले आणि उर्वरित भाषण सभागृहात पटलावर ठेवले. 

Budget 2020 Important Highlights : अर्थसंकल्प 2020 मधील महत्त्वाच्या घोषणा

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

यावेळी राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलले, गडकरींनी त्यांच्या जवळीत चॉकलेट सीतारामन यांना दिलं. मात्र त्यांनी ते घेतलं नाही. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारामन यांनी दुसरे बजेट सादर केले. पहिल्या बजेट भाषणात त्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ बजेट भाषण करण्याचा विक्रमही केला. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारने अंतरिम बजेट सादर केला. 5 जुलै रोजी सादर केलेले त्यांचं अंतरिम बजेट भाषण 2 तास 17 मिनिटांचं झालं होतं. यंदाचं भाषण करुन त्यांनी जुना ७ महिन्याचा त्यांचाच विक्रम मोडला आहे. 

अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला 

'अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट'

2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता, जो निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच हा रेकॉर्ड  मोडला. निर्मला सीतारामन यांच्यापूर्वी देशाचे अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली होते. त्यांनी 2018 मध्ये त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना 1 तास 49 मिनिटे भाषण केले. त्यात 18,604 शब्दांचा वापर करण्यात आला होता. 2015 मध्ये अरुण जेटली यांनी सुमारे 2 तास 10 मिनिटे भाषण केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही: बच्चू कडू

'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली 

...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट

आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाNitin Gadkariनितीन गडकरीRajnath Singhराजनाथ सिंह