शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 15:22 IST

आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे की २०२०-२१ आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली आहे.

नवी दिल्ली - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, तत्पूर्वी आज संसदेत निर्मला सितारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०१९-२० सादर केला. या अहवालात देशाच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आकडे समोर आले आहेत. 

मोदी सरकारने २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशाचा जीडीपी विकास दर वार्षिक ८ टक्के असणं गरजेचे आहे असं अर्थतज्ज्ञांचे मत आहे. पण हे ध्येय निश्चित केल्यानंतर पहिल्या वर्षात आर्थिक पाहणी अहवालाने मोदी सरकारला झटका दिला आहे. यावर्षी जीडीपी दर ५ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, तर पुढच्या वर्षी मोदी सरकारने ठरवलं तर हा जीडीपी विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकतो. 

५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला धक्का?आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे की २०२०-२१ आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी जीडीपीचे जे लक्ष्य ठरवलं गेले त्यासाठी हा विकास दर दीड ते दोन टक्क्यांनी कमी आहे. 

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी वाढीचा दर ६ ते ६.५ टक्के असेल तर पुढील तीन वर्षांत ५ ट्रिलियन लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी जीडीपी दराची अंदाजी वाढ ८ टक्क्यांपेक्षा जास्त हवी. कारण सरकारने २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक सर्वेक्षण अहवालाची आकडेवारी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे.  

२०२४ पर्यंत मोदींचे स्वप्न पूर्ण होणार?गेल्या वर्षी जेव्हा नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जुलै २०१९ मधील अर्थसंकल्प होण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याची घोषणा केली. त्याच वेळी, असा अंदाज केला गेला आहे की २०२४ पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कमीतकमी ८ टक्के जीडीपी विकास दर आवश्यक असेल. परंतु सरकारनेच चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे. 

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ साठी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बड्या उद्योगपती व अर्थशास्त्रज्ञांशी सतत बैठक घेतल्या. या बैठकीत ५ ट्रिलियन भारतीय अर्थव्यवस्थेबाबतही चर्चा झाली

टॅग्स :budget 2020बजेटNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन