शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:03 IST

159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.  

ठळक मुद्दे1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प होणार आहे.अर्थमंत्री ज्या लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणतात. ती लाल रंगाची सुटकेसही खास आहे. 159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची परंपरा आहे.  

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प हा नवीन येणाऱ्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अंमलात असतो. अंतरिम अर्थसंकल्पात फक्त जमाखर्चाचा तक्ता दिलेला असतो. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही सवलती जाहीर करता येत नाहीत. कारण, सरकारने अर्थसंकल्पाचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकू नये यासाठी तसा कायदा करण्यात आला आहे.दरम्यान, हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी अर्थमंत्रालयाकडून जास्त मेहनत घेतली जाते. संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाकडे देशातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच, अर्थमंत्री ज्या लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणतात. ती लाल रंगाची सुटकेसही खास आहे. कारण, गेल्या 159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.  1860 साली ब्रिटनचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी लेदर बॅगेतून पहिल्यांदा आर्थिक लोखाजोखा आणला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ब्रिटनच्या राणीने स्वतःहून विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांना ही खास सूटकेस गिफ्ट दिली होती.त्यानंतर नकळत लाल सुटकेसचा पायंडाच पडला. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थ संकल्प मांडण्यात आला. त्यावेळी षण्मुखम चेट्टी यांनीही पहिल्यांदा लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता. त्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री लाल रंगाची नवीन सुटकेस वापरतात. 

संसदेत आत्तापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केलाय अर्थसंकल्प  १९४७-४९ आर. के. षन्मुखम चेट्टी१९४९-५० जॉन मथाई१९५०-५७ सी. डी. देशमुख१९५८-६३ मोरारजी देसाई१९६३-६५ टी. टी. कृष्णमचारी१९६५-६७ सचिंद्र चौधरी१९६७-६९ मोरारजी देसाई१९७१-७५ यशवंतराव चव्हाण१९७५-७७ चिदम्बरम सुब्रहमयम१९७७-७९ हरिभाई एम पटेल१९८०-८२ आर. वेंकटरमण१९८२-८४ प्रणब मुखर्जी१९८४-८७ व्ही पी सिंह१९८७-८८ एन डी तिवारी१९८७  राजीव गांधी१९८८-८९ शंकरराव चव्हाण१९८९-९० मधु दंडवते१९९०-९१ यशवंत सिंह१९९१-९६ मनमोहन सिंह१९९७-९८ पी चिदम्बरम१९९९-२००१ यशवंत सिन्हा२००३-०४ यशवंत सिन्हा२००५-०८ पी चिदंबरम२००९-१२ प्रणब मुखर्जी२०१२-१४ पी चिदम्बरम२०१४-१८ अरुण जेटली

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019