शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : प्राप्तिकरात घट, ज्येष्ठांना चार हजार कोटींची सवलत!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:56 IST

देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात अनेक सवलती जाहीर केल्या.

नवी दिल्ली - देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात अनेक सवलती जाहीर केल्या. प्राप्तिकर कमी भरावा लागेल व हाती असलेल्या पुंजीवर दीर्घकाळ निश्चित दराने व्याज मिळून ज्येष्ठांच्या हाती चार पैसे अधिक राहतील, असे त्यांचे स्वरूप आहे.नव्या सवलती अशासध्या ज्येष्ठ नागरिकांनाही इतरांप्रमाणेच, प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४ ए नुसार, बँका व पोस्टात ठेवलेल्या ठेवींवरील वर्षाचा १० हजार रुपयांपर्यंतचे व्याजाचे उत्पन्न करमुक्त होते. त्याहून अधिकच्या व्याजातून प्राप्तिकर कापून घेतला जातो. आता करमुक्त व्याजाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला ५० हजार रुपये होईल. ही सवलत मुदत ठेवी व आवर्ती ठेवींवरील व्याजाला मिळेल.सध्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी नुसार ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचा हप्ता किंवा वैद्यकीय उपचारांसाठी खर्च केलेली वर्षाला ३० हजार रुपयांपर्यंतची रक्कम करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. ती वर्षाला ५० हजार रुपये होईल.काही ठराविक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी केलेला वर्षाला ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. आता ही खर्च मर्यादा ज्येष्ठांसाठी वर्षाला ८० हजार रुपये व अतिज्येष्ठांसाठी (८० वर्षांहून अधिक) वर्षाला एक लाख रुपये होईल.वय वंदन योजना वाढविलीसध्या आयुर्विमा महामंडळातर्फे ज्येष्ठांसाठी ‘प्रधानमंत्री वय वंदन योजना’ राबविली जाते.या योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या एकरकमी ठेवीवर १० टक्के दराने १० वर्षे हमखास परतावा देण्याची हमी आहे. या योजनेची मुदत दोन वर्षे (मार्च २०२० पर्यंत) वाढविली आहे.या योजनेत एका व्यक्तीला जास्तीत जास्त ७.५ लाख रुपये ठेवता येतात. ही ठेवमर्यादा १५ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत ७.५ लाख रुपये ठेवल्यास दरमहा पाच हजार रुपये व १५ लाख रुपये ठेवल्यास दरमहा १० हजार रुपये परतावा मिळेल.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८newsबातम्या