शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2017 - ग्रामीण भागाला होणारे 10 फायदे

By admin | Updated: February 1, 2017 13:19 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पातून भरभरून तरतुदी केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के इतका असेल. शेतक-यानी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.  शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. 

अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी 9 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षात मान्सून चांगला झाल्याने यावर्षी चांगली पिके येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

-  2017-18 आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्रासाठी 1 लाख 87 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, प्रथमच इतकी विक्रमी तरतूद करण्यात आली असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागासाठी 24 टक्क्यांनी तरतूद वाढवण्यात आली आहे. 
 
- ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा स्त्रोत असलेल्या मनरेगा योजनेसाठी यंदा 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत मनरेगासाठी 9500 कोटींनी तरतूद वाढवण्यात आली आहे. मागच्यावर्षी 38500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
 
- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला आहे. 
 
- अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणासाठी महिला शक्ती केंद्र उभारणार. 
 
 
- 1 मे 2018 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागांमध्ये वीज पोहोचणार. 
 
-  बेघर आणि कच्चा घरात राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घर बांधणीचे लक्ष्य. 
 
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 15 हजार कोटीवरुन तरतूद 23 हजार कोटी करण्यात आली. 
 
- 2016-17 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत दिवसाला 133 किमी रस्ते बांधणी सुरु आहे. 2011-14 मध्ये हेच प्रमाण 73 किमी होते. 
 
 

 

  •