शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 08:51 IST

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (13 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी चकमक सुरू झाली आहे. चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (13 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

पुलवामा चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तर दोन जवान शहीद झाले. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती.

 

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. केलम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना शनिवारी (9 फेब्रुवारी) उशिरा रात्री मिळाली होती. यानंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलम गावाला घेराव घातला आणि परिसरात शोध मोहीम करण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त 

रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या आसपास सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या 6 तासांनंतर जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरच स्फोटकांनी उडवले.  या कारवाईदरम्यान, 5 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. शोध मोहिमेदरम्यान जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि अन्य साहित्यही जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका मोस्ट वॉन्डेट दहशतवादी कमांडरचाही सहभागी असू शकतो. मात्र भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी