शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांनी स्वीकारला बौद्ध धर्म

By admin | Updated: April 14, 2016 15:17 IST

हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याची आई व भावाने आज बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या विद्यार्थ्याने जानेवारी महिन्यात केलेल्या आत्महत्येवरून उठलेले वादळ आत्ता कुठे शांत होत असतानाच रोहितची आई व त्याचा भाऊ राजा, यांनी आज हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125व्या जयंती असून त्या पार्श्वभूमीवरच रोहितच्या कुटुंबियांनी आज दादरमधील आंबेडकर भवनात धर्मांतर केले, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात पीएच.डी करणा-या रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर हल्ला केल्या प्रकरणी रोहित आणि अन्य चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या शिफारसीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या पाचविद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या वर्गाला उपस्थित रहाण्याव्यतिरिक्त वसतिगृहात येण्यावर बंदी घालण्यात आली होती. 
रोहितच्या आत्महत्येमुळे देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत रोहितच्या आत्महत्येला भाजपा, अभाविप आणि विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोपही झाला. यावरून संसदेतही गोंधळ झाला, वादळी चर्चाही झाली होती.
रोहितच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी करत त्याच्या आईने आंदोलनही केले होते. अखेर आता त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 
 दलित असल्याने रोहितचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेरीस आता रोहितची आई राधिका वेमुला आणि भाऊ राजा वेमुला यांनी हिंदू धर्मावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 'मार्च महिन्यात माझी व त्यांची या विषयावर चर्चा झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या जयंतीदिनी आपल्याला अधिकृतरित्या बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितल्याचे रोहितच्या मित्राने माझ्यापाशी नमूद केले होते' असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.