शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Buddhadeb Bhattacharjee : डाव्या चळवळीचा नेता हरपला! पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:34 IST

Buddhadeb Bhattacharjee : बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Buddhadeb Bhattacharjee : कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगा सुचेतन असा परिवार आहे.

बुद्धदेव भट्टाचार्य हे दक्षिण कोलकाता येथील बल्लीगंज भागात एका साध्या सरकारी अपार्टमेंटमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागत होतं. गेल्या वर्षी न्यूमोनिया झाल्यानं त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवावं लागलं होतं. आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अनेक नेत्यांनी सुद्धा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव २००० साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. 

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नोव्हेंबर २००० ते मे २०११ पर्यंत बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले. दरम्यान, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीने डाव्यांची सत्ता संपवली. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पक्षाच्या पराभवानं बंगालमधील ३४ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आली.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया