- प्रज्ञा केळकर-सिंग/स्नेहा मोरेमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) : आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले महाराज सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी असलेली बडोदेनगरी सारस्वतांच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. ९१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.व्यासपीठाला विंदांचे नावसाहित्यनगरीतील मुख्य व्यासपीठाला ‘विंदा करंदीकरविचारपीठ’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीची धुरा नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांभाळली.
सारस्वतांच्या मेळ्यासाठी बडोदेनगरी सज्ज, व्यासपीठाला विंदांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 06:25 IST