शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

BSNLची धमाकेदार ऑफर, दररोज मिळवा 2 जीबी फ्री डेटा

By admin | Updated: March 16, 2017 21:00 IST

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फक्त 339 रुपयांमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी 3जी डेटा मोफत मिळणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - रिलायन्स जिओनं दिलेल्या 4जीच्या फ्री डेटामुळे ग्राहकांची संख्या लाखांच्या वर गेली असताना त्याची धास्ती घेत प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही मोफत कॉलिंग आणि फ्री 4जी डेटाचे अनेक प्लॅन बाजारात आणले आहेत. विशेषतः या स्पर्धेत भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी दूरसंचार कंपनीही सहभागी झाली आहे. बीएसएनएलनं एक जबरदस्त प्लॉन लाँच केला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फक्त 339 रुपयांमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी 3जी डेटा मोफत मिळणार आहे. तसंच देशभरात कुठेही तुम्हाला बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड मोफत कॉलिंग करता येणार आहे. गुरुवारी बीएसएनएलनं हा प्लॅन लॉन्च केला आहे.बीएसएनएलच्या या ऑफरनुसार ग्राहकाला बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड मोफत कॉलिंग करता येणार आहे. तसंच 28 दिवसांपर्यंत त्यांना दररोज दोन जीबी डेटा वापरता येणार आहे. मात्र हा प्लॅन फक्त 90 दिवसांपुरताच मर्यादित आहे. सध्या तरी रिलायन्स जियो 31 मार्चपर्यंत दररोज एक जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल मोफत देत आहे. मात्र 1 एप्रिलपासून रिलायन्स जियो या सुविधेसाठी युझर्सला 99 रुपयांचं रजिस्ट्रेशन शुल्क भरून प्राइम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर 303 रुपये महिन्याभरासाठी मोजावे लागणार आहेत. रिलायन्स जिओची ही ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत असणार आहे.

(एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)(एअरटेल धमाका: 345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)बीएसएनएलनं हा नवा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देताना हा सर्वोत्तम प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. दररोज 2 जीबी डेटाची ऑफर दूरसंचार उद्योग क्षेत्रातली जबरदस्त ऑफर ठरणार आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना अल्प दरात चांगली सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. सध्याची मार्केटमधली स्थिती पाहता आम्हाला ग्राहकांसाठी हा प्लॅन लाँच करावा लागला आहे. बीएसएनएल ते इतर कंपन्यांच्या ग्राहकांशी बोलण्यासाठी आम्ही रोज 25 मिनिटे मोफत देणार आहोत. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटांना 25 पैसे दर आकारला जाणार असल्याची माहिती बीएसएनएलचे डायरेक्टर (कन्ज्झुमर मोबिलिटी) आर. के. मित्तल यांनी दिली आहे.