शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या भुजमध्ये सीमेवर पाकिस्तानची बोट सापडल्याने खळबळ; BSF कडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:53 IST

बीएसएफने सांगितले की, इंजिन नसलेली बोट जप्त केली आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही.

नवी दिल्ली. भारतीय सीमा सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. गुजरातमधील भुजमध्ये भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी जहाज ताब्यात घेतले आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे गुजरात बीएसएफने म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत सुमारे 100 मीटर आत दिसली, त्यानंतर ती जप्त करण्यात आली, असे बीएसएफचे म्हणणे आहे. दरम्यान, आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली आहे. ही एक पारंपारिक बोट आहे, जी मासेमारीसाठी वापरली जाते. बोट इंजिनशिवाय आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, बीएसएफ भुजचे पथक अरबी समुद्राजवळ गस्त घालत होते. त्यावेळी बीपी क्रमांक 1158 हरामी नाला परिसरात काही संशयास्पद गोष्टी घडण्याची शक्यता होती. त्यानंतर पाकिस्तानी मच्छीमार तीन-चार बोटीतून भारतीय पाण्यातून खोलवर येत असल्याचे दिसले. यानंतर बीएसएफ पथक जात असताना पाकिस्तानी मच्छिमार परिसरातील झुडपांच्या मदतीने लपून पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर बीएसएफच्या पथकाने एक बोट ताब्यात घेतली.

संपूर्ण परिसरात शोधमोहीम बीएसएफने सांगितले की, इंजिन नसलेली बोट जप्त केली आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. बोटीत फक्त मासे, जाळी आणि इतर काही मासेमारीचे साहित्य दिसत होते. मात्र बीएसएफच्या पथकाने या संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. यानंतरही काही मिळाले मिळाले नाही. पाकिस्तानी मच्छिमार आधीच पळून गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दल