शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:32 IST

काही दिवसापूर्वी बीएएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

काही दिवसापूर्वी बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रेल्वेची अवस्था खराब असल्याचे दिसत आहे.  सीमा सुरक्षा दलाचे (BSF) सुमारे १२०० सैनिक अमरनाथ यात्रेसाठी ड्युटीवर जात होते. हे सर्व सैनिक गुवाहाटीहून काश्मीरला जात होते आणि त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची मागणी करण्यात आली होती.  बीएसएफने दोन एसी सेकंड क्लास कोच, दोन एसी थर्ड क्लास कोच, १६ स्लीपर कोच आणि चार जनरल स्लीपर कोचची मागणी केली होती. त्यानंतर, भारतीय रेल्वेने त्यांना दिलेल्या ट्रेनची अवस्था खूपच वाईट होती. ट्रेनच्या बोगीही खूप वाईट होत्या.

हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

रेल्वे खराब आणि त्यामध्ये घाणीचे साम्राज्य होते. ती रेल्वे ७२ तास उशिराने धावत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर, बीएसएफने आगरतळा स्टेशन मॅनेजरकडे तक्रार पाठवली. रेल्वेने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि निष्काळजीपणाबद्दल चार अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. यामध्ये ट्रेनच्या खिडक्या तुटलेल्या आणि दरवाजे जाम असल्याचे दिसून आले. शौचालयेही खूप घाणेरडी होती आणि सीट्स तुटलेल्या होत्या. अनेक डब्यांमध्ये वीज कनेक्शन नव्हते आणि ट्रेनमध्ये झुरळे फिरत होते.

कारवाई करण्यात आली- अश्विनी वैष्णव

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वेने तात्काळ कारवाई केली. बीएसएफच्या तक्रारीनंतर रेल्वेने कारवाई केली. नंतर सर्व सैनिकांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या प्रकरणाबाबत निवेदन दिले. 

या प्रकरणाबाबत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४ अधिकारी दोषी आहेत, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचे स्पष्टीकरण

ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी के.के. शर्मा यांनीही या प्रकरणाबाबत निवेदन दिले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे डबे प्रवाशांसाठी नव्हते. ते देखभालीसाठी ट्रेनमध्ये जोडले होते. या डब्यांवर स्पष्टपणे लिहिले होते की हे प्रवाशांसाठी नाहीत आणि ते सर्व्हिसिंगसाठी नेण्यात आले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल