शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 16:08 IST

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे.

बंगळुरु - पुरामुळे कर्नाटकातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सीएम येडियुरप्पा यांनी बुधवारी घोषणा केली की, जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये देईल त्या गावाचं नाव कंपनीच्या नावावर ठेवलं जाईल. 

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील जवळपास 22 जिल्ह्यातील  गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे 200 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं. त्यामुळे या सर्व गावांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कर्नाटक सरकारला पडला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कमीत कमी 60 उद्योगपतींची यासाठी भेट घेतली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, मदत आणि पुर्नवसनाचं काम करण्यासाठी ज्या गावाला कंपनी पैसे देईल ते गाव कंपनीने दत्तक घेतलं असं मानलं जाईल. आत्तापर्यंत विविध संस्थांकडून मुख्यमंत्र्यांकडे 4 कोटी रुपये मदत प्राप्त झाली आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर लोकांनी आता कर्नाटकातील गावांची गावं अंबानी, अडाणी आणि टाटा ठेवली जातील असं म्हटलं आहे. 

कर्नाटकात आलेल्या पुरामुळे आजपर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक गावांना अद्यापही धोका कायम आहे. एनडीआरएफ आणि लष्कराद्वारे करण्यात येणाऱ्या बचावकार्यात 6 लाख 98 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. 

56 हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसानराज्यात पूरगस्तांसाठी 1 हजार 160 निवारा केंद्र बनविण्यात आली आहेत. चार लाख लोकांना स्वच्छ पाणी, जेवण आणि अन्य सामान देण्याची व्यवस्था केली आहे. सरकारी माहितीनुसार 22 जिल्ह्यातील 103 तालुक्यांना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. घरांसोबत पिकांचे नुकसान झाले आहे. 4.58 लाख हेक्टर क्षेत्रातील कृषी आणि बागायत शेतीचे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकfloodपूर