शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:10 IST

अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो.

रमाकांत पाटील -भरूच : गुजरात विधानसभा निवडणुकीत भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर-हासोट विधानसभेची निवडणूक सध्या सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मोठा भाऊ जिंकणार की लहान, याबाबतची चर्चा रंगली आहे.

अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो. या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार ईश्वरसिंग पटेल हे सलग चार वेळा भाजपकडून विजयी झाले आहे. आता ते पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी गुजरात सरकारमध्ये चार वेळा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसने त्यांचे सख्खे मोठे बंधू विजयसिंग पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही भावांची ही लढत गुजरातच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेची ठरली आहे.

मतदार संभ्रमात -- कुडाद्रा गावात मात्र नागरिकांचा संबंध दोन्ही भावांशी येत असल्याने आणि गावात बहुतांश नातेसंबंधाचे लोक राहात  असल्याने मतदारांमध्ये कुणाला मतदान करावे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. - गावात फारसे राजकीय चुरशीचे वातावरण नाही. दोन्ही भावांमध्ये आरोप-प्रत्यारोपही नाही, दोन्ही उमेदवारांशी चर्चा केल्यावर ते एकमेकांवर कुठलीही टीकाटिप्पणी करीत नाही. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ElectionनिवडणूकGujaratगुजरात