ेडोक्यात सिमेंटची वीट घालून खून
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पुणे : हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या परिसरात मृतदेह आढळला. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ेडोक्यात सिमेंटची वीट घालून खून
पुणे : हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या परिसरात मृतदेह आढळला. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळुराम कानपिळे (वय ५२, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महंमदवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी नउ वाजता कानपिळे यांचा मृतदेह हांडेवाडी रस्त्यावरील वनविज्ञान केंद्राच्या आतील बाजुस पडल्याची माहिती एका व्यक्तीने महंमदवाडी इंटिग्रेटेड पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली. त्यांच्या डोक्यावर, तोंडावर, कपाळावर जखमा झालेल्या दिसत होत्या. तसेच त्याठिकाणी सिमेंटची वीटही आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.----------