शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोजा इफ्तार पार्टीतून बंधुभाव संदेश

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे़

सोलापूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे़
राजर्षी शाहू महाराज संस्था
कुमठा नाका येथील राजर्षी शाहू महाराज संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ याप्रसंगी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, रियाज हुंडेकरी, संभाजी आरमारचे जिल्हाप्रमुख संजय सरवदे, रेवणजी पुराणिक, शिवसेना विभागप्रमुख इब्राहीम पिरजादे, संस्थापक नागेश इंगळे, प्रकाश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते़
आझादी बचाव ग्रुप
किडवाई चौकात हत्तुरे हॉलमध्ये आझादी बचाव ग्रुपच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, माजी आमदार नरसय्या आडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एफ़वाय़काझी, नलिनीताई कलबुर्गी, प्राचार्य डॉ़ दलाल, नगरसेवक रफिक हत्तुरे, हाजी ए़ यु़ शेख, डॉ़ कादरी, डॉ़ माघामी, डॉ़ हनीफ सातखेड, महिबूब हिरापुरे, हाजी ख्वाजादाऊद पटेल, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एजाज शेख, अजीजभाई पटेल, सलीमभाई लोखंडवाला, एजाज पटेल, अमजद मुजावर, निजाम बिराजदार, इक्बाल दलाल, मिन्हाज पटेल आदी उपस्थित होते़
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपर्क कार्यालयात रोजा इफ्तार पार्टी करण्यात आली़ यावेळी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा़ राजकुमार सोनवले, मारुती सोनवले, प्रभाकर गायकवाड, जक्कप्पा कांबळे, विनोद इंगळे, सुशील भुताळे, आनंद कांबळे, अभिजित गायकवाड, बबलू इंगळे, अमीर उस्ताद, निसार उस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते़
यशदा युवती व महिला फाउंडेशन
यशदा युवती व महिला फाउंडेशनच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ यावेळी आ़ प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ नगरसेविका फिरदोस पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांनी त्यांचे स्वागत केले़ याप्रसंगी शहर काझी अमजदअली, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पक्षनेते संजय हेमगड्डी, मनपाच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील, नगरसेवक देवेंद्र भंडारे, नगरसेवक चेतन नरोटे, रफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, दत्तोबा बंदप˜े, माजी महापौर नलिनी चंदेले, बाबासाहेब वाघमारे, परिवहन सभापती सलीम पामा, माजी सभापती सुभाष चव्हाण, कुमूद अंकाराम, नीला खांडेकर, सुनीता कारंडे, सुरेश पाटोळे, सिद्धाराम चाकोते, बशीर शेख, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते़