केळकर समिती अहवालावर व्यापक चर्चा अपेक्षित (भाग २)
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
चौकट
केळकर समिती अहवालावर व्यापक चर्चा अपेक्षित (भाग २)
चौकटमोठी धरणं पूर्ण करण्याचे आव्हान राज्यातील सिंचनाचे प्रमाण देशात शेवटून दुसरे आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना छोटे बंधारे हा त्यावर पर्याय ठरू शकतो. कारण मोठ्या धरणांसाठी लागणारा निधी परवडणारा नाही, मोठी धरणं पूर्ण करण्याचे आव्हान अवघड आहे, असे चव्हाण म्हणाले.-०-०-०-उद्योगांसाठी हवी सवलत विदर्भासारख्या मागास भागात उद्योग सुरू करायचे असेल तर त्यांना भरघोस सवलती दिल्याशिवाय पर्याय नाही. आघाडी सरकारने या दिशेने प्रयत्न केले होते. नवीन सरकारने याबाबत एक पाऊल पुढे टाकावे. आघाडी सरकारने मिहानला चालना देण्यासाठी प्रयत्न केले, टीसीएस आणि इन्फोसीसने येथे गुंतवणूक केली आहे. अमरावती व भंडारा येथील काही प्रकल्प रखडले आहे. नवीन सरकारने यासंदर्भात पावले उचलावीत, असे चव्हाण म्हणाले.-०-०-०-०-०-०-०-०-माध्य. शिक्षणात गुणवत्ता वाढआयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण कमी आहे. याची कारणे जाणून घेतली असता माध्यमिक शिक्षणात गुणवत्ता वाढ करणे आवश्यक असल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या काळात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजना राबविण्यात आल्या. पण आता शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर द्यावा लागणार आहे, असे चव्हाण म्हणाले.-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-