शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:43 IST

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F-35B फायटर जेट गेल्या दहा दिवसांपासून केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडले आहे.

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक एफ-३५बी फायटर जेट गेल्या दहा दिवसांपासून केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडले आहे. सुमारे ११० दशलक्ष डॉलर्स (जवळपास ९५० कोटी रुपये) किमतीचे हे पाचव्या पिढीतील स्टील्थ जेट १४ जून रोजी आपत्कालीन लँडिंगनंतर अजूनही तिथेच उभे आहे. या महागड्या विमानाची अजूनही घरवापसी का झाली नाही, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

केरळमध्ये आपत्कालीन लँडिंगहे ब्रिटिश जेट सध्या तिरुवनंतपुरम विमानतळावर उभे असून, त्याची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान करत आहेत. सुरुवातीला इंधनाची कमतरता हे आपत्कालीन लँडिंगचे कारण सांगितले जात होते, परंतु नंतर असे समोर आले की, विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड होता. अनेक प्रयत्नांनंतरही हे विमान अद्याप उड्डाण करण्यास सक्षम झालेले नाही.

ब्रिटिश F-35B विमान का अडकले?एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले ब्रिटिश रॉयल नेव्हीचे F-35B लाइटनिंग II लढाऊ विमान १४ जून रोजी तिरुवनंतपुरममध्ये उतरले. पीटीआयच्या वृत्तानुसार, या विमानाने केरळच्या किनार्‍यापासून सुमारे १०० सागरी मैल दूर असलेल्या ब्रिटिश विमानवाहू नौकेवरून उड्डाण केले होते. इंधन कमी झाल्याने त्याला तिरुवनंतपुरममध्ये उतरवण्यात आले. मात्र, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इंधनाची कमतरता आणि खराब हवामान यामुळे विमानाला तातडीने उतरण्याची परवानगी घ्यावी लागली.

भारतीय वायुसेनेची मदतगेल्या आठवड्यात भारतीय वायुसेनेच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, "F-35चे मार्ग बदलणे ही सामान्य बाब आहे. भारतीय वायुसेनेला याची पूर्ण माहिती आहे आणि त्यांनी उड्डाण सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाला सुविधा पुरवल्या आहेत. सर्व प्रकारची मदत दिली जात आहे आणि वायुसेना सर्व एजन्सींसोबत समन्वय साधत आहे." हे लढाऊ विमान हिंद महासागरातील संयुक्त सागरी सरावाचा भाग होते.

फ्लाइट रडार डेटावरून असे दिसून आले की, या जेटने केरळ किनार्‍याजवळ काही काळासाठी आणीबाणी ट्रान्सपाँडर कोड 'SQUAWK 7700' पाठवला होता, जो संकटाचा संकेत होता. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलने यावर त्वरित प्रतिसाद दिला. मात्र, नंतर हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा होत गेला.

फायटर जेटची घरवापसी कशी होणार?विमान उतरल्यानंतर भारतीय वायुसेनेने इंधन भरण्यासह सर्व आवश्यक मदत पुरवली. मात्र, उड्डाणाची तयारी करताना विमानात हायड्रॉलिक समस्या निर्माण झाली आणि ते उड्डाण करण्यात अयशस्वी झाले. लढाऊ विमानात हायड्रॉलिक्स अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ते लँडिंग गियर, ब्रेक आणि फ्लाइट कंट्रोलसारख्या प्रमुख कार्यांना नियंत्रित करतात.

कॅरिअर स्ट्राइक ग्रुपच्या ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या तंत्रज्ञांनी तिरुवनंतपुरममध्ये विमानाची तपासणी केली, परंतु ते बिघाड दुरुस्त करू शकले नाहीत. हायड्रॉलिक बिघाडामुळे जेटच्या मुख्य सिस्टीमवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे ते उड्डाणासाठी योग्य राहिले नाही. संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले की, जर विमानाच्या दुरुस्तीचे प्रयत्न अयशस्वी झाले, तर विमानाला लष्करी वाहतूक विमानाद्वारे किंवा विमानवाहू नौकेद्वारे ब्रिटनला परत न्यावे लागू शकते.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानKeralaकेरळ