तृतीयपंथीसाठी नवीन धोरण आणा
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर : तृतीयपंथी लोकांसाठी महापाालिकेने नवीन धोरण अमलात आणावे, अशी मागणी तृतीयपंथी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संघटनेचे नेते जम्मू आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात बाबा सेनापती, सचिव विद्या कांबळे आदींचा समावेश होता. हा समाज उपेक्षित असून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत ...
तृतीयपंथीसाठी नवीन धोरण आणा
नागपूर : तृतीयपंथी लोकांसाठी महापाालिकेने नवीन धोरण अमलात आणावे, अशी मागणी तृतीयपंथी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संघटनेचे नेते जम्मू आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात बाबा सेनापती, सचिव विद्या कांबळे आदींचा समावेश होता. हा समाज उपेक्षित असून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. एप्रिल २०१४ मध्ये सवार्ेंच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसऱ्या वर्गाची मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)