शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 21:49 IST

PM Modi BRICS Summit 2023: पीएम नरेंद्र मोदींसह चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यात सामील होणार आहेत.

Narendra Modi BRICS Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यासाठी 22 ऑगस्ट रोजी सकाळी पंतप्रधान मोदींचे विमान द. आफ्रिकेच्या दिशेने उड्डाण घेईल.

22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.15 वाजता ते दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचतील. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता पंतप्रधान मोदी ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी होतील. यानंतर रात्री 9.30 वाजता ब्रिक्स लीडर्स रिट्रीटमध्येही ते उपस्थित राहणार आहेत. ही बंद दाराआड होणारी बैठक आहे.

असा आहे पीएम मोदींचा कार्यक्रमPM मोदी 23 ऑगस्ट रोजी ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. ही परिषद 2 सत्रात होणार आहे. 24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी ब्रिक्स आफ्रिका आउटरीच कार्यक्रमात सामील होतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतील काही नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. ब्रिक्स परिषद भारतासाठी महत्वाची असणार आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष सामील होणारब्रिक्स परिषद महत्त्वाची आहे, कारण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही त्यात येणार आहेत. याशिवाय, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन व्हर्च्युअली हजेरी लावतील. त्यांच्या वतीने रशियाकडून परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षही दक्षिण आफ्रिकेत उपस्थित राहणार आहेत. 

काय आहे ब्रिक्स?BRICS हा पाच देशांचा एक समूह आहे. यात जगातील 5 वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका, असे पाच देश आहेत. ब्रिक्स देशांची लोकसंख्या जगाच्या सुमारे 42% आहे. हे 30 टक्के क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. यासह, ब्रिक्स देश जगाच्या जीडीपीमध्ये 23% योगदान देतात.

ब्रिक्सची सुरुवात कधी झाली?BRIC ची औपचारिक स्थापना 16 जून 2009 रोजी झाली आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या गटात सामील झाल्यानंतर त्याचे नाव BRICS असे ठेवण्यात आले. सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि अर्जेंटिना यांच्यासह 30 हून अधिक देशांना ब्रिक्समध्ये सामील व्हायचे आहे.

द. आफ्रिकेनंतर ग्रीसला जाणारदक्षिण आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी ग्रीसच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ग्रीसच्या पंतप्रधानांनी पीएम मोदींना आमंत्रित केले आहे. गेल्या 40 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट असेल. 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींचे ग्रीसमध्ये औपचारिक स्वागत होईल. ग्रीसच्या पंतप्रधानांशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी ग्रीसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनाही संबोधित करतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSouth Africaद. आफ्रिकाchinaचीनrussiaरशियाBrazilब्राझीलInternationalआंतरराष्ट्रीय