लाचखोर शिरीष यादवच्या दुधारीतील घरावर छापा
By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST
तासभर तपासणी : वडिलोपार्जित घर, शेतजमीन
लाचखोर शिरीष यादवच्या दुधारीतील घरावर छापा
तासभर तपासणी : वडिलोपार्जित घर, शेतजमीन सांगली : झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणचा लाचखोर उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष रामचंद्र यादव (४५) याच्या दुधारी (ता. वाळवा) येथील घरावर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) गुरुवारी रात्री छापा टाकला. घराची तासभर झडती घेण्यात आली, पण काहीच आढळून आले नाही.झोपडपी पुनर्वसन योजनेमध्ये येणारे धार्मिक स्थळ अनधिकृत दाखविण्यासाठी यादवने संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच लाखाचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने गुरुवारी यादवला रंगेहात पकडले होते.एसीबीच्या पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगलीच्या विभागाशी संपर्क साधून त्यांच्या दुधारी येथील घरावर छापा टाकून झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकून झडती घेतली. यामध्ये यादव याचे वडिलोपार्जित घर व शेतजमीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)