शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०%

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 06:09 IST

६० टक्के लोकांनी घेतल्या लसीच्या दोन्ही मात्रा; युरोपमध्येही वाढताहेत असे रुग्ण

ठळक मुद्देकेरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढणे कमी निश्चित झाले. परंतु, आजही संपूर्ण देशात सर्वात जास्त नवे रुग्ण केऱळमधीलच आहेत.

थिरुवनंतपुरम (केरळ) : केरळमध्ये कोरोनाचे ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे (कोरोना विषाणूवरील लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणे) रुग्ण सतत वाढत असून रोज येत असलेल्या एकूण रुग्णांमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे रुग्ण ४० टक्के आहेत. युरोपमधील अनेक देश नव्या रुग्णांनी त्रासून गेले आहेत. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या रोज नवे विक्रम करीत आहे. भारतात कोरोनाची सुरुवात केरळमधून झाली होती आणि आता याच राज्यात लस घेतलेले लोकही कोरोनाबाधित होत आहेत. इतर राज्यांतही कोरोनाचे ब्रेकथ्रू रुग्ण वाढल्यास बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.

केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढणे कमी निश्चित झाले. परंतु, आजही संपूर्ण देशात सर्वात जास्त नवे रुग्ण केऱळमधीलच आहेत. राज्यात गेल्या एक आठवड्यापासून रोज सरासरी ६,६०० नवे रुग्ण समोर येत आहेत. काळजीची बाब अशी की, रुग्णांच्या एकूण संख्येत ब्रेकथ्रू रुग्ण ४० टक्के आहेत. केरळमध्ये ९५ टक्के लोकसंख्येला लसीची पहिली मात्रा तर ६० टक्के लोकांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोनाचे २० लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. हे रुग्ण एका आठवड्यात समोर आलेले आतापर्यंतचे सर्वात जास्त आहेत.कोरोनामुळे होत असलेल्या एकूण मृत्यूतील जवळपास निम्मे मृत्यू युरोपियन देशात होत आहेत. एकूण रुग्णांमधील ६० टक्के रुग्ण हे युरोपातील आहेत. ज्या देशांत निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे त्या देशांत रुग्ण वाढत आहेत. म्हणून अनेक देश आपल्या नागरिकांना बूस्टर मात्राही देत आहेत. जर्मनीत १० नोव्हेंबर रोजी ५१ हजार नवे रुग्ण समोर आले. हे रुग्ण आतापर्यंत एका दिवसातील सर्वात जास्त आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKeralaकेरळ