शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:07 IST

...अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काही लोकांकडून जनतेला बूट, जॅकेट, ब्लँकेट आदी साहित्य आणि पैसे वाटले जात आहे आणि मतदान करण्यासाठी मुलाबाळांची आणि देवाची शपथ दिली जात आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी, जनतेला या शपथा तोडून मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

'आप' राष्ट्रीय संयोजक केजरीवाल शुक्रवारी एका व्हिडिओ मैसेज मध्ये म्हणाले, "मला असे समजले आहे की, आपण जेव्हा पैसे घेण्यासाठी गेला होतात, तेव्हा त्यांनी आपल्याला शपथ दिली. कुणाला मुलाची शरपथ दिली, तर कुणाला देवाची शपथ दिली. वेगवेगळ्या शपथा दिल्या. त्या शपथेची चिंता करू नका. त्या शपथांना काही अर्थ नाही. शपथेला तेव्ह अर्थ प्राप्त होतो, जेव्हा एखाद्या पवित्र आणि प्रामाणिक कामासाठी आपण ती घेतो. जर आपण एखाद्या बेईमान व्यक्तीकडून पैसे घेत असाल आणि तो आपल्याला शपथ देत असले अथवा खायला सांगत असेल, तर ती शपथ लागत नाही. ती खोटी शपथ आहे."

मी हनुमानजींना सांगेन की -दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शपथ तोडण्याचा एक मार्गही सांगितला, ते म्हणाले, "आपण आपल्या देवाच्या मूर्तीसमोर उभे राहा आणि हात जोडून सांगा की, देवा, मला जबरदस्तीने शपथ घ्यावी लागली. ती शपथ खोटी आहे. मी देशासाठी मतदान करेन. मी त्या देशद्रोह्यांना मतदान करणार नाही. आपण असे देवाला सांगितले की आपली शपथ तुटून जाईल. मीही हनुमानजींच्या मंदिरात जात असतो. पुढच्या मंगळवारी मंदिरात जाईन, तेव्हा मी हनुमानजींना सांगेन की, माझ्या लोकांकडून जबरदस्तीने जी शपथ घेतली गेली आहे, ती त्यांना लागू देऊ नकोस. देव माझे ऐकतो". एवढेच नाही तर, लोकांनी त्यांच्या इच्छेनुसार मतदान करावे, कुणी कोणाला मतदान केले हे कुणालाही समजत नाही, असेही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल