पानटपरी फोडून सिगारेट, तंबाखूसह रोकड लांबविली
By admin | Updated: October 29, 2016 01:06 IST
जळगाव : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सणासुदीच्या काळात आता पानटपर्यांनाही चोरटे लक्ष्य करीत आहेत. शिवकॉलनीनजीकच्या कोपर्यावर महामार्गाजवळील चंद्रभान पाटील रा.शिवकॉलनी यांची पानटपरी फोडून चोरट्यांनी तंबाखू, सिगारेट व इतर साहित्यासह चार हजार रुपये रोकड लंपास केली आहे.
पानटपरी फोडून सिगारेट, तंबाखूसह रोकड लांबविली
जळगाव : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सणासुदीच्या काळात आता पानटपर्यांनाही चोरटे लक्ष्य करीत आहेत. शिवकॉलनीनजीकच्या कोपर्यावर महामार्गाजवळील चंद्रभान पाटील रा.शिवकॉलनी यांची पानटपरी फोडून चोरट्यांनी तंबाखू, सिगारेट व इतर साहित्यासह चार हजार रुपये रोकड लंपास केली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. गुरुवारी पहाटे पाटील हे टपरीवर गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसात लागलीच तक्रार केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. अखेर याप्रकरणी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पानटपरीच्या पुढील भागातील पत्रा वाकवून ही चोरी झाली. मागील वर्षीची पानटपरीचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला होता, असे फिर्यादी चंद्रभान पाटील यांनी म्हटले आहे.