शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

ब्रॅण्ड मोदीचा ९०० ठिकाणी त्रैवार्षिक सोहळा!

By admin | Updated: May 11, 2017 00:33 IST

मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाल मे महिन्यात पूर्ण होत असल्याने देशातल्या ९00 ठिकाणी तो धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाल मे महिन्यात पूर्ण होत असल्याने देशातल्या ९00 ठिकाणी तो धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. या तमाम सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी ७४ केंद्रीय मंत्र्यांना देशभर पाठवले जाणार असून, त्याची सारी जबाबदारी मुख्यत्वे भाजपचे आमदार व खासदारांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रातल्या एनडीए सरकारचा उल्लेख पहिल्या दिवसापासून मोदी सरकार असाच होत असल्याने सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त सलग २0 दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सारे केंद्रीकरणही ब्रँड मोदींभोवतीच आहे. पंतप्रधान मोदी देशातल्या पाच प्रमुख सोहळ्यांचे नेतृत्व स्वत: करणार असून, पहिला सोहळा आसाममध्ये संपन्न होणार आहे. सरकारच्या कार्यशैलीचे वर्णन करण्यासाठी पंतप्रधानांच्या व्यक्तिगत पत्राच्या २ कोटी प्रती या निमित्ताने तयार करण्यात आल्या आहेत. देशातल्या अधिकाधिक लोकांपर्यंत, विशेषत: सरकारी योजनांच्या लाभार्थींपर्यंत त्या २६ मेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी २0 मे रोजीच ही पत्रे पोस्ट केली जाणार आहेत. याखेरीज मोबाईलधारकांना १0 कोटी एसएमएसद्वारे पंतप्रधानाच्या न्यू इंडिया संकल्पनेचा संदेश पाठवला जाणार आहे. घराघरांत मोदींचे नाव पोहोचावे, हा त्यामागचा उद्देश आहे.पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी दिल्लीत २७ आणि २८ मे रोजी केंद्रीय मंत्र्यांचे विविध गट पत्र परिषदांबरोबर वार्तालापाचे कार्यक्रम आयोजित करणार आहेत. देशातल्या ज्या ९00 ठिकाणी हे केंद्रीय मंत्री जातील, तिथे महिला, तरुण पिढी, शेतकरी, दलित व मागासवर्गीयांशी त्यांचा संवाद घडवणारे कार्यक्रम होतील. याखेरीज प्रमुख महाविद्यालये, आयआयटी व आयआयएमसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांमधेही हे मंत्री जातील. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत हितगुज करतील. याखेरीज ग्रामीण भागातल्या अशा गावात या मंत्र्यांना एक पूर्ण दिवस व्यतीत करावा लागेल, ज्याचे विद्युतीकरण अलीकडेच झाले आहे. या विद्युतीकरणामुळे ज्यांनी आपल्या घरात प्रथमच विजेचा प्रकाश पाहिला अशा कुटुंबाबरोबर सकाळचा नाश्ता अथवा दुपारचे भोजन हे मंत्री ग्रहण करतील. मेकिंग अँड डेव्हलपिंग-‘मोदी फेस्टिव्हल’ नावाने तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त ‘मेकिंग अँड डेव्हलपिंग इंडिया’ फेस्टिव्हल देशभर ठिकठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. याच्या जोडीला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत, राज्यांच्या राजधानीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, मोदी सरकारच्या विविध उपक्रमांबरोबरच राज्य सरकारने राबवलेले प्रमुख कार्यक्रम व त्याला मिळालेले यश यांचे भव्य सादरीकरण त्यात केले जाईल. गतवर्षी मोदी सरकारने आपल्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण केली. त्यावेळी कार्यक्रमाचे घोषवाक्य ‘मेरा देश बदल रहा है’ होते. मात्र, यंदाच्या कार्यक्रमांसारखा मोठा धूमधडाका त्यावेळी नव्हता, याचे मुख्य कारण बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा तेव्हा नुकताच धुव्वा उडाला होता. यंदा मात्र भाजपला उत्तर प्रदेश, उत्तराखंडाच्या निवडणुकीतील नेत्रदीपक यश मिळाले. गोवा आणि मणिपुरात भाजपचे सरकार स्थापन झाले.देशभर विरोधकांनी नोटाबंदीसारख्या वादग्रस्त विषयाबाबत गदारोळ उठवला असतानाही जनतेचे व्यापक जनसमर्थन नोटाबंदीच्या निर्णयाला प्राप्त झाले. यामुळे सत्ताधारी भाजपमधे प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्साह ठिकठिकाणी उत्सवी स्वरूपात साजरा करण्याचे पक्षाने ठरवले आहे. युपीएशी तुलना करणारमोदी सरकारच्या ३ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात नेमके कोणते परिवर्तन झाले, याची जाणीव देशातल्या मतदारांना करून देण्यासाठी हिंदीसह विविध भाषांमधे ‘अब और तब’ शीर्षकाची पुस्तिका वाटली जाईल. यूपीएची १0 वर्षे आणि मोदी सरकारच्या ३ वर्षांच्या कारकीर्दीची तुलना त्यात केलेली असेल.