शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
5
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
6
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
7
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
8
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
10
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
11
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
12
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
13
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
14
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
15
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
16
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
17
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
18
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
19
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
20
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

संविधान निर्मितीत ब्राह्मणांचेही योगदान, डाॅ. आंबेडकर यांच्या वक्तव्याचा कर्नाटकच्या न्यायमूर्तींनी दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:28 IST

Constitution: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकला.  

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकला.  

१८ व १९ जानेवारी रोजी आयोजित ‘विश्वामित्र’ या दोन दिवसीय ब्राह्मण संमेलनात न्या. दीक्षित म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर यांनी एकदा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये म्हटले होते की, बी. एन. राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्यास २५ वर्षे लागली असती.’

न्या. दीक्षित म्हणाले की, संविधान मसुदा समितीत ७ सदस्यांपैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अयंगार आणि बी. एन. राव हे तिघे ब्राह्मण होते. ब्राह्मण हा जातिवाचक न मानता ‘वर्णाशी’ जोडला जायला हवा. 

वेद व्यास, महर्षी वाल्मिकींचा दाखलान्या. दीक्षित म्हणाले, वेदांची रचना करणारे वेद व्यास हे मच्छिमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी मागासवर्गीय जाती-जमातीतील होते. तरी ब्राह्मणांनी त्यांना कधीच कमी लेखलेले नाही. शतकानुशतके आपण भगवान श्रीरामांची पूजा करीतत आलो आहोत. त्यांची मूल्येही आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आली आहेत. 

न्यायालयीन कक्षेतच हे भाष्यपूर्वी ब्राह्मणेत्तरांच्या राष्ट्रवादी आंदोलनात आपला सहभाग होता, असा उल्लेख दीक्षित यांनी केला. न्यायाधीश होताच या उपक्रमापासून दूर झाल्याचे सांगून या सर्व गोष्टी आज न्यायालयीन कक्षेतच आपण करीत असल्याचे न्या. दीक्षित म्हणाले.

संमेलनावर टीका करणाऱ्यांना उत्तरसंमेलनात उपस्थित न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंद यांनी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट करीत संमेलनाच्या भव्यतेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तरच दिले. आज अन्न व शिक्षणासाठी अनेकांचा संघर्ष सुरू असताना अशा आयोजनाची गरज काय, असा प्रश्न काहींनी केला. पण या समुदायाची एकजूट व त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चेसाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे न्या. श्रीशानंद म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयKarnatakकर्नाटक