शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

शाब्बास पोरी! वडिलांनी कांदे-बटाटे विकून कष्टाने शिकवलं; आता लेक झाली मोठी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:40 IST

जुही कुमारीचे वडील  कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते.

एखादे ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले तर तुम्ही त्यात नक्कीच यश मिळवू शकता. असे अनेक लोक आहेत ज्यांनी सुविधा नसतानाही यश मिळवले आहे, अशाच एका महिलेबद्दल जाणून घेऊया जिने अडचणींशी लढा देऊन आरडीओ पद मिळवले. बिहार लोकसेवा आयोगाने BPSC च्या 66 व्या एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालानंतर बिहारला मुलींसह अनेक टॉपर्स मिळाले. पण या टॉपर्सपैकी एक, जुही कुमारीसाठी, हे यश खूप खास आहे आणि इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीपीएससीच्या निकालामुळे बिहारमधील सारण जिल्ह्यातील मधुरा खुर्द येथील रहिवासी जुहीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जुहीला 307 वी रँक मिळाली आहे आणि ती आता आरडीओ म्हणजेच ग्रामीण विकास अधिकारी बनली आहे. हा निकाल जाहीर झाल्यापासून कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. जुही कुटुंबात सर्वात लहान आहे. तिला दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे.

मुलीच्या यशाचा अभिमान 

जुही कुमारीचे वडील  कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर मुलीला प्रत्येक पाऊलावर आधार देऊन ते प्रोत्साहन देत आहेत. मीडियाशी बोलताना जुहीच्या वडिलांनी सांगितले की, मला मुलीच्या यशाचा अभिमान आहे. त्यांनी सांगितले की, जुहीने मधौरामध्ये राहून इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी छपरा येथून ग्रॅज्युएशन केलं. जुहीला दोनदा अपयश आलं आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं

जुहीने सांगितले की, ती यापूर्वी दोनदा मुख्य परीक्षेत नापास झाली होती, पण हिंमत हरली नाही. त्यानंतर चांगले दिवस आले. तिला तिसर्‍या प्रयत्नात यश तर मिळालेच पण 307 वी रँकही मिळाली. जुहीची बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. BPAC ने निकालाच्या अधिसूचनेत माहिती दिली होती की एकूण 1,768 उमेदवार या व्हिवा-व्होस चाचणी/मुलाखतीमध्ये उपस्थित होते, तर 70 गैरहजर राहिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"