शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 4 वर्षीय मुलाच्या पोटात सापडलं मॅग्नेटिक ब्रेसलेट, एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 09:54 IST

एका 4 वर्षीय मुलाच्या पोटात चक्क मॅग्नेटिक ब्रेसलेट सापडलं. एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

अनेकदा लहान मुलं खेळताना नाणी किंवा इतर वस्तू गिळतात. अशी अनेक प्रकरणे रोज पाहायला व ऐकायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका 4 वर्षीय मुलाच्या पोटात चक्क मॅग्नेटिक ब्रेसलेट सापडलं. एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. सायन्स डायरेक्टच्या वृत्तानुसार, चार वर्षांच्या मुलाला दोन दिवसांपासून पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती, त्यानंतर पालकांनी मुलाला रुग्णालयात नेले. 

मुलाचा एक्स-रे काढला तेव्हा सगळेच चक्रावून गेले. मुलाने नकळत मॅग्नेटिक ब्रेसलेट गिळल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवस सर्व काही सामान्य होते, पण नंतर मुलाला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. पालकांना या प्रकरणाची माहिती नव्हती. त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचताच एक्स-रे पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. 

तपासाअंती डॉक्टरांना प्रथम मुलाला अ‍ॅपेन्डिसाइटिस झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर पालकांच्या संमतीनंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले, त्यानंतर तीन दिवसांनी त्याला उलट्या होऊ लागल्या. याच दरम्यान मुलाच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. एपेन्डेक्टॉमीनंतरही पोटदुखी कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दोन दिवसांनंतर, लक्षणे पूर्वीसारखीच होती, त्यामुळे काय चूक आहे हे शोधण्यासाठी डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा असे दिसून आले की मुलाच्या पोटात मॅग्नेटिक ब्रेसलेट आहे, ज्यामुळे मुलाला त्रास होत आहे. याच दरम्यान, डॉक्टरांनी इमर्जन्सी लॅपरोटॉमी आणि त्यानंतर उपचार करून 18 चुंबकीय मण्यांनी बनवलेले ब्रेसलेट बाहेर काढलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :doctorडॉक्टर