शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा

By मोरेश्वर येरम | Updated: December 6, 2020 14:44 IST

विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला बॉक्सर विजेंदर सिंगचा पाठिंबाशेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा नाहीतर खेलरत्न पुरस्कार परत देण्याचा इशारासिंघू सीमेवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचला विजेंदर सिंग

दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज सलग ११ वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी थंडीत गेल्या १० दिवसांपासून दिवसरात्र ठिय्या मांडून बसले आहेत. सिंघू सीमेवर आज बॉक्सर विजेंदर सिंग देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचला आहे. 

"शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार आहे", असा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 

पुरस्कार वापसीची मोहीमविजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश आहे. ९ डिसेंबरला पुढील बैठकशेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या बैठकांमध्ये आतापर्यंत काहीच तोडगा निघालेला नाही. शनिवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेली पाचवी बैठक देखील निष्फळ ठरली. आता ९ डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. तर शेतकरी संघटनांकडून ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची घोषणा करण्यात आली आहे. 

टॅग्स :Vijender Singhविजेंदर सिंगFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली