दोघांनी केली आत्महत्या
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
दोघांनी केली आत्महत्या
दोघांनी केली आत्महत्या
दोघांनी केली आत्महत्यानागपूर : विषारी औषध प्राशन करून तसेच लोखंडी रॉडला ओढणी बांधून आत्महत्या केल्याप्रकरणी कोतवाली आणि सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी १२ वाजता भुतेश्वर नगरातील रहिवासी अमर बबन दवंडे (२७) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़ सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहने ले-आऊटमध्ये पुंडलिक मोतीकर यांच्या घरी किरायाने राहणारे चंद्रकांत शामलाल उपाध्याय (३५) यांनी आपल्या घरी लोखंडी रॉडला ओढणी बांधून गळफास घेतला.