गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
गळफास घेऊन दोघांची आत्महत्यानागपूर : आपल्या राहत्या घरी गफळास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याची घटना कळमना आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रेणुकानगर गांधीबाग येथील रहिवासी हरिराम खुमानसिंग पाल (३०) यांनी आपल्या राहत्या घरी सिलिंगच्या कडीला दोरी बांधून मंगळवारी सकाळी ७ वाजेपूर्वी गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत पंचवटीनगर बाबा ताज किराणा दुकानाजवळील रहिवासी जितेंद्र आनंद मेश्राम (३६) यांनी आपल्या राहत्या घरी सिलिंगच्या कडीला साडीचा फॉल बांधून गळफास घेतला.