शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला लावले मृत व्यक्तीचे दोन्ही हात, विज्ञानाचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:25 IST

दोन हात, तब्बल 32 डाॅक्टर, 22 तास

कोलकाता : सरकारी रुग्णालय एसएसकेएमच्या डॉक्टरांनी २७ वर्षीय तरुणाला मृत व्यक्तीचे दोन्ही हात लावून नवा चमत्कार केला आहे. भारतातील वैद्यकीय शास्त्रातील ही एक दुर्मीळ घटना मानली जात आहे. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया रविवारी पहाटे ३ वाजता संपली. ही शस्त्रक्रिया तब्बल २२ तास चालली. रुग्णालयातील ३२ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने हा चमत्कार केला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाला २७ तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सध्या तरुणाला सीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असताना शॉक लागल्याने तरुणाचे दोन्ही हात जळाले होते, असे शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांनी सांगितले.

शस्त्रक्रियेसाठी विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करून परवानगी घेण्यात आली. आणि अनेक चाचण्यांनंतर प्रत्यारोपण करण्यात आले. आता शरीर हात कधी स्वीकारेल हे पाहणे आव्हानात्मक आहे. यासाठी उच्च प्रतीची औषधे वापरली जात आहेत. 

पत्नीने अवयवदानासाठी दिला होकार९ जुलै रोजी हावडा येथील उलुबेरिया येथे हरिपद राणा एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते. चार दिवसांनी ते ब्रेन डेड झाले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांचा रक्तगट आणि पेशींची माहिती घेण्यात आली. त्याचवेळी बिराटी येथील रहिवासी असलेल्या इलेक्ट्रिशियन तरुणावर वर्षभरापासून एसएसकेएमच्या प्लास्टीक सर्जरी विभागात उपचार सुरू होते. त्याला दोन्ही हात हवे होते. रुग्णालयाने हरिपद यांच्या कुटुंबीयांना दोन्ही हात दान करण्याची विनंती केली. यावर हरिपद यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला.

सहसा अशा प्रकारे शरीराच्या फक्त अंतर्गत भागांचे प्रत्यारोपण केले जाते. दोन्ही हात प्रत्यारोपणाचे हे प्रकरण दुर्मीळ आहे. -डॉ. राकेश जैन, प्लास्टिक सर्जन, एसएमएस मेडिकल कॉलेज

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल