शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:29 IST

विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाचे संविधान निर्माण करण्यात अनेक पक्षांचे योगदान आहे. ते कुठल्या एका पक्षाने तयार केले नाही. मात्र, एक पक्ष सातत्याने संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. काँग्रेसने केवळ संविधानात संशोधनच केले नाही, तर ते बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राजनाथ यांनी केला.

संविधान हृदयात हवेसंविधान नेत्यांच्या हातात नाही तर हृदयात हवे असे नमूद करत लोजप खासदार शांभवी चौधरी यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. 

राज्यघटना कोणत्या एका पक्षाची देणगी नाही. भारताचे संविधान देशातील नागरिक, भारताचे विचार आणि मूल्यांवर आधारीत दस्तऐवज आहे.      - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

काँग्रेसने कलम ३५६ चा गैरवापर केला : जेडीएस  देशात काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्या पंतप्रधानांनी कलम ३५६ चा गैरवापर करत अनेक राज्यांमधील सरकारे पाडल्याचा आरोप पंचायत राजमंत्री व जेडीएस नेते राजीव रंजन सिंह यांनी केला. 

दहा वर्षांत धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा : तृणमूल  दहा वर्षांत देशातील धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा करत ती मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत तसा उल्लेख असल्याचे नमूद करत बॅनर्जींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabhaलोकसभा