शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Boris Johnson: भावा 'बुलडोझर' मी चालवणार, PM जॉन्सन यांच्या जेसीबी फोटोवरुन भन्नाट मिम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:48 IST

जॉन्सन यांचे गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली

अहमदाबाद - दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली अनेकांची घरे आणि दुकाने बुलडोझरच्या सहाय्याने हटवली आहेत. त्यावरुन, मोठा वादंग निर्माण झाला असून केंद्र सरकारविरुद्ध विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बुलडोझर चर्चेचा विषय बनला असतानाच आता ब्रिटनच्या पंतप्रधानांनी बुलडोझरवर पोज देत, याकडे लक्ष वेधले आहे. बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट देणारे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत.

जॉन्सन यांचे गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य होते ते हृदय कुंज आणि त्यांच्या अनुयायी मीराबेन यांच्या मीरा कुटीर येथेही त्यांनी भेट दिली. जॉन्सन यांनी चरख्यावर सूत कताईदेखील केली. साबरमती आश्रमातर्फे त्यांना दोन पुस्तके भेट देण्यात आली.  दरम्यान, आपल्या अहमदाबाद दौऱ्यात त्यांनी एका जेसीबी बनविणाऱ्या कंपनीलाही भेट दिली. यावेळी, जेसीबीवर चढून त्यांनी पोझ देत फोटोही काढले. सध्या बोरीस यांचे हेच फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.  बोरीस यांचे हे फोटो पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. ट्विटरवरुन या फोटोसह मिम्सही व्हायरल झाले आहेत. आज से जेसीबी तेरा भाई चलाएगा... असं कॅप्शन देऊन एकाने ट्विटर युजर्संने मिम्स बनवले आहे. तर, योगींच्या नावानेही काही मिम्स बनविण्यात आल्याचे दिसून येते. 

बोरीस जॉन्सन यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुख्य कार्यालयासही भेट दिली. ब्रिटनच्या पहिल्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाल्याचे ते म्हणाले. नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन एनर्जी आणि नवीन ऊर्जा क्षेत्रांवर प्रदीर्घ चर्चा केली. तसेच, संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाची सह-निर्मिती करण्यासाठी युकेतील कंपन्यांसोबतही अदानी ग्रुप काम करेल, असे म्हटले.  जॉन्सन यांचा अभिप्राय  

या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या सोप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे सौभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बोरिस जॉन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नोदविला.

टॅग्स :GujaratगुजरातBoris Johnsonबोरिस जॉन्सनLondonलंडनahmedabadअहमदाबाद