शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

नेहरूंच्या जयंतीला मागवली दीनदयाळ यांची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 04:19 IST

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्य सादर करा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केल्यामुळे सारेच जण चक्रावून गेले.

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्य सादर करा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केल्यामुळे सारेच जण चक्रावून गेले. मुख्य म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित पुस्तके पाठवण्याचे आवाहन मात्र केले गेले नाही.जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर सेंट्रल लायब्ररीने सहभागी प्रकाशकांना १० नोव्हेंबर रोजी एक मेल पाठविला आहे. त्यात पं. दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कधीही प्रकाशित झालेली आणि २०१६-१७मध्ये प्रकाशित झालेली अन्य पुस्तके सादर करण्यात यावीत, असे कळविण्यात आले.जेएनयूने १४ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. मात्र प्रकाशकांना याबाबत काही निर्देश दिल्याचे वृत्त ग्रंथपाल रमेश सी. गौर यांनी फेटाळले. ग्रंथालयाचे सहायक ऋषभ जैन यांनी जारी केलेल्या पत्रात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीनदयाल उपाध्याय यांच्याशी संबंधित कधीही प्रकाशित झालेली पुस्तके सादर करण्यात यावीत, असा उल्लेख होता.>हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्यांची पुस्तकेगौर यांनी सांगितले की, एवढे मोठे ग्रंथ प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले होते. यात ६० विक्रेते आणि प्रकाशक यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या एका प्रकाशकाने सांगितले की, जेएनयूकडून अधिकृत मेल मला मिळाला. त्यात हिंदुत्वाची प्रतिमा असलेले नेते व दलित समाजसुधारकांशी संबंधित पुस्तके सादर करावीत, असे नमूद केले होते. अन्य एका अधिकाºयाने सांगितले की,डॉ. आंबेडकर आणि उपाध्याय यांच्याशी संबंधित ५०० पुस्तके खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीनदयाळ उपाध्याय यांची विचारसरणी ही नेहरूंच्या विचारांच्या विरुद्ध आहे.