शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीन; फौजदारीस स्थगिती; हायकोर्ट आदेशाविरुद्ध उत्पादक सुप्रीम कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:30 IST

पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी अपेक्षित

नवी दिल्ली : सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या, पुरवठादार व बियाणे निरीक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.सोयाबीनची पेरणी केल्यावर बियाणे उगवत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या ‘लोकमत’सह अन्य माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची जनहित याचिका म्हणून स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. तानाजी नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने २६ जून रोजी हा आदेश दिला होता.

‘सीड इंडस्ट्रिज असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (सिआम) ही बियाणे उत्पादकांची संघटना तसेच अकूर सीड््स (नागपूर), ग्रीन गोल्ड सीड््स (वळूज, औरंगाबाद), बसंत अ‍ॅग्रोटेक इंडिया (अकोला) व ईगल सीड््स (इंदूर) या कंपन्या तसेच मकरंद मधुकर सावजी (नागपूर) या पुरवठादाराने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली. त्यावर न्या. रोहिंग्टन फली नरिमन व न्या. नविन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ सुनावणी झाली.

याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व महाराष्ट्र सरकारसाठी ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर खंडपीठाने अपिल सुनावणीसाठी दाखल करून घेत प्रतिवादींना नोटीस जारी केली आणि नंतरची सुनावणी होईपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली. पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे. येथून पुढे शेतकºयांनी अशा बोगस बियाण्यांची तक्रार केल्यावर बियाण निरीक्षकांनी प्रयोगशाळेत तपासणी करून घेऊन पोलिसांत फिर्याद नोंदवावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

गेल्या पाच वर्षांत अशा किती कारवाया केल्या गेल्या, किती बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले गेले याची माहिती सादर करण्यासही न्यायालयाने सरकारला सांगितले होते. अशा प्रकारच्या तक्री हजारो शेतकºयांकडून केल्या जाऊनही बियाणे कायद्यानुसार कारवाई करण्यात ढिलाई करण्यात येत असल्याबद्दल खंडपीठाने नाराजीही व्यक्त केली होती.

च्औरंगाबाद खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश देऊन पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवली होती. परंतु त्याच दिवशी असोसिएश्न व कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात हे अपील दाखल केले. च्खंडपीठाचा हा आदेश ३ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता. मात्र आता तो कुठे दिसत नाही.

टॅग्स :IndiaभारतCourtन्यायालय