शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर सापडला IAS अधिका-याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:02 IST

बिहारमधील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी गाझियाबादमधील रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगाझियाबाद रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. , मला माफ करा, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहीले होते.

बक्सर, दि. 11 - बिहारमधील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी गाझियाबादमधील रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुकेश पांडे असे मृत अधिका-याचे नाव असून ते बिहारच्या बक्सरमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे. 

गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. मुकेश पांडे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. मला आयुष्याचा कंटाळा आला आहे, मला माफ करा, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहीले होते. मुकेश पांडे दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील रुम नंबर 742 मध्ये उतरले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

मुकेश पांडे काही दिवसांपूर्वी बक्सरमध्ये न्यायदंडाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी ते कटिहार येथे डीडीसी होते. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने त्यांच्यासोबत काम करणा-या सहका-यांना जबर धक्का बसला आहे. ते निघताना पाटण्याला चाललो असे सांगून निघाले होते. मुकेश पांडे यांनी नेमकी कोणत्यावेळी कशा पद्धतीने आत्महत्या केली ते आता सांगता येणार नाही असे तपास अधिका-यांनी सांगितले. 

पांडे आत्महत्या करणार असून ते पश्चिम दिल्लीतील मॉलच्या दिशेने गेले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलीस तात्काळ त्या दिशेने गेले. पण मुकेश पांडे तिथे नव्हते. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पांडे मॉलमधून बाहेर पडून मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

मुकेश पांडे यांच्या अकाली मृत्यूबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. ते सक्षम अधिकारी होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे नितीश कुमारांनी म्हटले आहे. सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून मुकेश पांडे यांची ओळख होती.