शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 4 दिवसांत नोकरी; महापालिकेचं संवेदनशील पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:27 IST

महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला कर्तव्य बजावताना मृत्यू

मुंबई: गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसात कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांमध्ये पालिकानं याबद्दलची कार्यवाही केली. बृहन्मुंबई महापालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे कर्मचारी जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला मृत्यू झाला. अतिवृष्टीत कर्तव्य बजावत या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूनं गाठलं. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचं आणि नियमानुसार कर्मचाऱ्याची देणी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचं आदेश संबंधित खात्याला दिले होते.यानंतर सहआयुक्त अशोक खैरे, पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी काल जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचं नियुक्ती पत्र आणि  आज सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश  सुपूर्द केला. बुधवारी (4 सप्टेंबर) झालेल्या अतिवृष्टी दरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे ३२ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी पी दक्षिण विभागातील कामगार जगदीश परमार यांचं कर्तव्य बजावताना निधन झालं. तसंच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्वरित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सर्वोपचार रुग्णालयात' नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका