शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्येही ब्लू व्हेलचा बळी, ब्लू व्हेलच्या सूत्रधार मुलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:41 IST

आॅनलाइनवर जीवघेणा ठरलेला ब्लू व्हेल गेमचा पहिला बळी येथील विघ्नेश (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठरला आहे. तामिळनाडूतील हा या गेमचा पहिला बळी आहे.

मदुराई : आॅनलाइनवर जीवघेणा ठरलेला ब्लू व्हेल गेमचा पहिला बळी येथील विघ्नेश (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठरला आहे. तामिळनाडूतील हा या गेमचा पहिला बळी आहे. मदुराईच्या पोलीस अधीक्षकांनी हा ब्लू व्हेल गेमचा बळी असल्याचे सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश मन्नारच्या तिरूमलाई नायकर महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसºया वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी तो त्याच्या घरी छताला फास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांना आढळला. त्याच्या हातावर धारदार वस्तूने ब्लू व्हेलचे चित्र काढलेले होते. त्याच्या घरी जी चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते की, ब्लू व्हेल खेळ नाहीतर धोका आहे. एकदा का तुम्ही त्यात प्रवेश केला की कधीही बाहेर पडू शकत नाहीत. (वृत्तसंस्था)नवी दिल्ली : ब्लू व्हेल चॅलेंज या नावाने अनेक गटांचे नेतृत्व करीत असल्याचा ठपका ठेवून १७ वर्षांच्या रशियन मुलीला अटक करण्यात आली. तिचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. या खेळातील आव्हान (चॅलेंज) पूर्ण न करणाºया किंवा खेळण्यास नकार दिलेल्यांना जीव घ्यायच्या धमक्या देण्यास ती जबाबदार असल्याचे वृत्त आहे.या खेळाचा शेवट आत्महत्येत होतो. ही मुलगी ‘डेथ ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेने म्हटले.ती स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळाडू होती. तिने ते आत्महत्येकडे नेणारे आव्हान पूर्ण केले नाही. त्याऐवजी ती त्या खेळाची अ‍ॅडमिन बनली. या ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची.

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल