शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

उज्ज्वला गॅसच्या निळ्या ज्वाळा फक्त पहिल्या मोफत सिलिंडरपुरत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:03 IST

महिलांची स्वयंपाक घरातील धुरापासून सुटका व्हावी, त्यांना स्वच्छ इंधन मिळावे, यासाठी मोदी सरकारची उज्ज्वला गॅस योजना २0१६ साली सुरू झाली

सुरेश भटेवरा  नवी दिल्ली : महिलांची स्वयंपाक घरातील धुरापासून सुटका व्हावी, त्यांना स्वच्छ इंधन मिळावे, यासाठी मोदी सरकारची उज्ज्वला गॅस योजना २0१६ साली सुरू झाली. दारिद्र्यरेषेखालील तसेच गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देणे हा या योजनेचा उद्देश. मात्र उज्ज्वला गॅसच्या सुखद निळ्या ज्वाळा पहिल्या सिलिंडरपुरत्याच मर्यादित राहिल्या. पुढचा सिलिंडर घेण्यासाठी पुरेसे पैसे गरीब कुटुंबांकडे नसल्याने गॅस आरंभशूर योजना ठरली.या योजनेद्वारे एप्रिल २0१८ पर्यंत साडेतीन कोटी नव्या गॅस कनेक्शन्सचे वाटप झाले. त्यामुळे २0१९ पर्यंत ५ कोटी तर २0२0 पर्यंत ८ कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे सरकारने ठरवले. गॅस कनेक्शनसाठी सुरुवातीला खर्च साधारणत: ४५00 रुपये येतो. सरकारने घाऊक खरेदी केल्याने एका कनेक्शनसाठी तो खर्च ३२00 रुपये आला. यापैकी १,६00 रुपयांपैकी निम्मे अनुदान, त्यात पहिल्या सिलिंडरची किंमत, रेग्युलेटर, पाइप इत्यादी सामग्री सरकारने मोफत पुरवली. कुटुंबाने १६00 रुपयांची दोन बर्नरची गॅस शेगडी स्वत: खरेदी करावी, अशी अट त्यात आहे. इतकी रक्कम एकदम खर्च शक्य नसल्यास मासिक हप्त्याने तेल कंपन्यांच्या योजनेतून त्याची खरेदी करण्याची सुविधाही आहे.गॅस असूनही शेणाच्या गोवऱ्या, चिपाड, लाकूड यांचा वापर अजूनही सुरू आहे. किती कुटुंबांनी सिलिंडर रिफिल केले, याची आकडेवारी जाहीर केलेली नाही. योजना २0१६ साली सुरू झाली तेव्हा देशात वापरात नसलेले ३.५५ कोटी कनेक्शन्स होते. एप्रिल २0१७ मध्ये त्यात ३ कोटी ५८ लाखांपर्यंत वाढ झाली, तर एप्रिल २0१८ पर्यंत वापर नसलेल्या कनेक्शन्सचा आकडा ३ कोटी ८२ लाखांवर पोहोचला. आकडेवारीनुसार २0१५/१६ साली ग्राहकांची संख्या १0.२ टक्के होती. ती २0१६/१७ साली १६.२ टक्क्यांपर्यंत वाढली. मात्र याच दोन वर्षांत सिलिंडर्सचा वापर ९ टक्क्यांवरून केवळ ९.८ टक्क्यांवर गेला. म्हणजेच गॅस कनेक्शन्स वाढूनही त्या प्रमाणात सिलिंडरचा खप वाढलेला नाही.गॅस शेगडी आली, पहिला सिलिंडर संपला. आता पुढच्या सिलिंडरसाठी पैसे नाहीत, अशी अनेक कुटुंबांची स्थिती आहे. सिलिंडरवर मिळणारी सबसिडी प्रत्येक राज्यानुसार वेगळी आहे.75% सरासरी गरीब कुटुंबांनी गॅस शेगडी हप्तेबंदीने खरेदी केली आहे. त्यांची सबसिडी हप्त्यापोटी परस्पर जमा होते. पुढल्या सिलिंडरचा किमान ३२ रुपये प्रति किलो ते कमाल ५६ रुपये प्रति किलो किमतीचा गॅसगरीब कुटुंबाना कायम कसापरवडेल, याचा विचार सरकारने केल्याचे दिसत नाही.