शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

SIRचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या BLOची बल्ले बल्ले, बक्षीस म्हणून मिळतंय सिनेमाचं तिकीट, हेलिकॉप्टर राईड आणि बरंच काही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:32 IST

SIR In Madhya Pradesh: एसआयआरचं काम मुदतीआधीच पूर्ण करून कार्यक्षमतेचं उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या बीएलओंना जिल्हा प्रशासनाकडून सन्मानित करून बक्षीसही दिलं जात आहे. मध्य प्रदेशमध्ये एसआयआरचं टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करणाऱ्या सुपर बीएलओंना टायगर सफारी, चित्रपटांचं तिकीट आणि हेलिकॉप्टर राईड अशी आकर्षक बक्षीसं दिली जात आहेत.  

सध्या देशातील काही राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनरीक्षणाचं (SIR) काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या बुथ लेव्हल ऑफिसरवर मोठ्या प्रमाणात दबाव येऊन त्यांच्यापैकी काहींनी जीवन संपवल्याच्या बातम्या येत आहे. मात्र दुसरीकडे एसआयआरचं काम मुदतीआधीच पूर्ण करून कार्यक्षमतेचं उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या बीएलओंना जिल्हा प्रशासनाकडून सन्मानित करून बक्षीसही दिलं जात आहे. मध्य प्रदेशमध्ये एसआयआरचं टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करणाऱ्या सुपर बीएलओंना टायगर सफारी, चित्रपटांचं तिकीट आणि हेलिकॉप्टर राईड अशी आकर्षक बक्षीसं दिली जात आहेत.  

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील स्नेहलता पटेल या त्यांच्या अधीन असलेल्या सर्व बुथवर १०० टक्के डिजिटायझेशनचं काम पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या बीएलओ सुपरवायझर बनल्या आहेत. त्यांनी निर्धारित वेळेपूर्वीच पनागर विधानसभा मतदारसंघातील ७ हजार ७०६ मतदारांचे अर्ज भरून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

जबलपूरचे जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांच्या सूचनेनुसार स्नेहलता पटेल यांना बक्षीस म्हणून पीएम श्री हेली पर्यटन सेवेच्या माध्यमातून जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कान्हा आणि बांधवगड येथील जॉय राईड करवण्यात आली. स्नेहलता यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, सर्व बीएलओंनी आपलं काम पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने पूर्ण करावे, असं आवाहन केलं आहे. 

रीवा जिल्ह्यामध्येही १२ बीएलओंनी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या वेळेच्या  मर्यादेपूर्वी १४ दिवस आधीच मतदारांच्या गणनेच्या १०० डिजिटायझेशनचं काम पूर्ण केलं आहे. याचं बक्षीस म्हणून सर्व बीएलओंना प्रशस्तीपत्र आणि संपूर्ण कुटुंबासोबत व्हाइट टायगर सफारी, मुकुंदपूर येथे फिरण्याचं आणि चित्रपटाचं तिकीट बक्षीस म्हणून देण्यात आलं. या बारा बीएलओंमध्ये सेमरिया येथील ५, सिरमौर येथील २, हुजूर येथील ४ आणि मनगवां मतदारसंघातील एका बीएलओचासमावेश होता.  याबाबत जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी सांगितलं की, या बीएलओंनी आपल्या निर्धारित वेळेपूर्वी १४ दिवस आधी आपलं उद्दीष्ट पूर्ण करत एक चांगलं उदाहरण समोर ठेवलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Successful BLOs Rewarded with Movie Tickets, Helicopter Rides, and More!

Web Summary : Madhya Pradesh BLOs exceeding voter list revision targets receive rewards like tiger safaris, movie tickets, and helicopter rides. Jabalpur's Sneh Lata Patel digitized all booths, earning a joyride. Rewa's BLOs also get family safaris and movie tickets for early completion.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMadhya Pradeshमध्य प्रदेश