शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:05 IST

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी दुपारी ग्रंथ प्रदर्शनातील प्रकाशकांच्या उद्रेकाने गालबोट लागले.

बडोदे : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी दुपारी ग्रंथ प्रदर्शनातील प्रकाशकांच्या उद्रेकाने गालबोट लागले. मराठी वाङ्मय परिषद बडोदाचे सदस्य आणि प्रधान डेकोरेटर्सचे सुजित प्रधान यांच्या दमदाटीविरोधात आवाज उठवित ग्रंथप्रदर्शनात सहभागी प्रकाशकांनी एकत्र येत संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांना घेराव घातला. अपुरे नियोजन, ढिसाळ व्यवस्था आणि प्रधान यांच्या दमदाटी व गुंडगिरीचा मनस्ताप झालेल्या प्रकाशकांनी सांस्कृतिक कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला होता.या संमेलनात ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांनी घेतलेल्या अतिरिक्त वस्तूंचे भाडे आताच्या आता द्या, असे म्हणत सुजित प्रधान आणि त्यांच्या माणसांनी प्रकाशकांना धमकाविले. शिवाय, स्टॉल्सवरील वस्तूही जप्त केल्या. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशकांनी एकत्र येत याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. प्रधान यांनी केलेल्या अरेरावीमुळे आणि गुंडगिरीच्या वर्तणुकीमुळे प्रकाशकांचा राग अनावर झाल्याचे दिसून आले. या तीनदिवसीय प्रदर्शनात प्रकाशकांना वीज, पाणी, मंडप, पंखे, टेबल या मूलभूत सोयीसुविधाही पुरविल्या नाहीत. काही प्रकाशकांच्या स्टॉल्समध्ये पंख्यांची व्यवस्था केली नाही, त्यामुळे रणरणत्या उन्हात या प्रकाशकांना तसेच ताटकळत राहावे लागले. प्रकाशकांनी स्टॉलचे पडदेही स्वत:च लावले, पाण्याची सोय नव्हती, आवारात स्वच्छतागृह नव्हते.या ग्रंथ प्रदर्शनात एकूण नामांकित प्रकाशकांसह छोट्या प्रकाशकांचे मिळून एकूण १३७ स्टॉल्स होते. या ग्रंथप्रदर्शनासाठी प्रत्येक प्रकाशकाकडून तीन दिवसांसाठी चार हजार रुपयांचे भाडे आकारण्यात आले. त्यात प्रदर्शन मैदानात असल्याने ओल्या गवतामुळे पुस्तकांना वाळवी लागल्याची तक्रार यावेळी प्रकाशकांनी मांडली. दवामुळे झालेल्या चिखलामुळे पुस्तकांचे नुकसान झाल्याचे प्रकाशकांनी सांगितले. या ठिकाणच्या साहित्यसंपदेच्या मालमत्तेची सुरक्षाही वाºयावरच असल्याची खंत व्यक्त झाली.तीन दिवसांत १० लाखांचीही विक्री नाहीडोंबिवली आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रदर्शनात मिळून जवळपास १० कोटींच्या घरांत प्रदर्शनविक्रीची उलाढाल पोहोचली होती. यंदाच्या संमेलनात मात्र वाचकवर्ग पुस्तके चाळायला फिरकला नाही. त्यामुळे सर्व स्टाल्सची मिळून प्रदर्शनाची तीन दिवसांची उलाढाला १० लाखांच्या घरातही पोचली नाही.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन