शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काळा पैसा दाखवा; निश्चिंत व्हा!

By admin | Updated: June 27, 2016 05:11 IST

अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले.

नवी दिल्ली : अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. स्वेच्छेने संपत्ती किंवा अज्ञात उत्पन्न घोषित केल्यास पैशाच्या स्रोताबाबत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही; मात्र संधीची ही खिडकी बंद झाल्यानंतर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती असेल त्यांना सरकारने एक विशेष संधी दिली आहे. तुम्ही दंड भरून विविध प्रकारच्या बोजातून मुक्त होऊ शकता. अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत ही अखेरची संधी असेल, हे मी देशवासीयांना सांगू इच्छितो. कुणाला नियम न पाळल्यामुळे ३० सप्टेंबरनंतर कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची वेळ आल्यास कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असे मी भाजपाच्या खासदारांना सांगितले आहे, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानकाळ बदलला, पण सवय कायमएक काळ असा होता की, कर खूप असल्यामुळे कर भरण्याचे टाळणे किंवा करचोरी करणे हा स्वभाव बनला होता. त्या काळात विदेशातून वस्तू आणताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तस्करीही तेवढीच वाढली होती, पण हळूहळू काळ बदलत गेला. आता करदात्यांना सरकारच्या करव्यवस्थेशी जोडणे अधिक अवघड काम राहिलेले नाही, तरीही जुनी सवय गेलेली नाही. नियमांपासून दूर पळत स्वत:ची शांती गमावू नका. कोणतीही छोटी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकेल. मग असे का होऊ द्यायचे? आपल्या संपत्ती किंवा उत्पन्नाबाबत सरकारला योग्य माहिती का देऊ नये. अडचणींपासून मुक्त व्हायचे असेल तर गतकाळात साठवून ठेवलेल्या बॅगा उघड्या करा, असे आवाहन मी देशवासीयांना करीत आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.>आणीबाणीची काळी रात्र४१ वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या आणीबाणीतील काळ्या रात्रीचे स्मरण करवून देताना मोदी म्हणाले की, लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे. लोकशाहीची कटिबद्धता पुढे न्यायला हवी. सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकाराचे चमकते उदाहरण आणीबाणीच्या काळात दिसून आले. देशाला त्याचे स्मरण परत परत करवून दिले जावे. २६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. याच दिवशी लोकांना सशक्त बनणारी लोकशाही तुडवली गेली. जयप्रकाश नारायण यांच्यासह लाखो लोक कारागृहात गेले होते. संपूर्ण देश कारागृह बनला होता. बरेचदा लोक माझ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची टर उडवितात. लोकशाहीला कटिबद्ध असल्यानेच हे शक्य झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.