शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावमध्ये काळा दिन! मराठी अस्मिता एकवटली; प्रश्न तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 02:59 IST

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, अशा घोषणा देत शुक्रवारी बेळगावात काळा दिन पाळण्यात आला. दंडाला काळ्या फिती, हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण सायकल फेरीत सहभागी झाले होते.

अत्याचाराला दाद न देता आपण लढा चालू ठेवला हे कौतुकास्पद आहे. हा प्रश्न तडीला लावल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सीमावासियांचे प्रश्न, समस्या विधानसभेत नक्की मांडेन असे, उद्गार आमदार राजेश पाटील यांनी काढले. मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते. जर सीमा भागातील कोणत्याही मराठी भाषिक नागरिकला त्रास द्याल तर बेळगावात संपूर्ण चंदगड घेऊन घूसू, असा इशारा देण्यात आला.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला. सीमा भागातील मराठी भाषिक लोकांना न्याय मिळावा म्हणून चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय तरुण काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते.‘शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी ठाम’सीमा भागासाठी ६९ शिवसैनिकांनी बलिदान दिले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे, असे आश्वासन शिवसेनेचे विधी मंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.