शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

“BJP सरकार केवळ उद्योगपतींचे, शेतकऱ्यांचे असते तर MSP कायदा आणला असता”: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:04 IST

Rakesh Tikait: शेतकऱ्यांसाठी दिल्ली दूर नाही, असा निर्धार ट्रॅक्टर मोर्चावेळी व्यक्त करण्यात आला.

Rakesh Tikait: पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर टीका केली आहे.

पंजाब येथील शेतकरी आंदोलनादरम्यान भारतीय किसान युनियनच्या टिकैत गटाने ट्रॅक्टर मार्च काढला होता. या मोर्चात राकेश टिकैत, नरेश टिकैत यांनी सहभाग घेतला. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातील शेतकरी एकवटले आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही कुठेही जायला तयार आहोत. शेतकऱ्यांसाठी दिल्ली दूर नाही, असे भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी सांगितले.

BJP सरकार केवळ उद्योगपतींचे, शेतकऱ्यांचे असते तर MSP कायदा आणला असता

यावेळी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, भाजप हे शेतकऱ्यांचे नाही तर उद्योजकांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे सरकार असते तर एमएसपीवर हमीभाव कायदा यापूर्वीच लागू झाला असता, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली. तत्पूर्वी एका महापंचायतीत बोलताना राकेश टिकैत यांनी सांगितले होते की, यापूर्वीही सरकारे होती आणि समस्याही आधीच्याच आहेत. पिकांना रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे हाल व्हावेत, अशी सरकारची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून जमिनी हिसकावण्याचा डाव सुरू आहे, या शब्दांत राकेश टिकैत यांनी निशाणा साधला होता. 

दरम्यान, बड्या कंपन्यांना फायदा व्हावा, अशा धोरणांवर काम सुरू असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. जेव्हा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्याच्याकडून जाईल, त्याचे वाहन खराब होऊन तेही हातून जाईल, असे झाले की त्याचा फायदा कंपन्यांना होईल. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखले आहे. २०२४ मध्ये सरकारला सत्तेत येण्यापासून शेतकरी रोखतील, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. उसाची थकबाकी द्यावी, एमएसपीवर हमीभाव कायदा करावा आणि शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन