पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा आता विभाजनवादी रणनीतीचा अवलंब करीत असल्यामुळे भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.‘भाजपाची हवा हळूहळू निघू लागली आहे आणि २०१५ मध्ये त्यांच्या दांभिकतेचा पराभव होईल. २०१४ मध्ये काळा पैसा परत आणणे, युवकांना रोजगार देणे व बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारखी अनेक खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली आहे; परंतु ही सर्व आश्वासने आता थंडबस्त्यात ठेवण्यात येत आहेत. भाजपा आता धर्मांतर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे नाव घेऊन जहाल संघटनांच्या मदतीने विभाजनवादी रणनीतीच्या आधारे लोकांचे लक्ष आपल्या अजेंड्यावरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे नितीशकुमार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.जुन्या जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, विलीनीकरण निश्चित होणार आहे. फक्त काही औपचारिकता बाकी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला अखंड जनता पार्टीसोबत येण्याचे निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर ‘या सर्व भविष्यातील गोष्टी आहेत’, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)४नव वर्षात भाजपाच्या राजवटीत आनंद साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या पतनाची सुरुवात होईल, असे भाकीत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वर्तविले आहे.‘आम्ही प्रत्येकाचे नूतन वर्षाभिनंदन करतो. पण यावेळी भाजपाच्या राजवटीत नववर्षात जल्लोष करण्यासारखे काही नाही. भाजपाच्या राजवटीत गरिबांचे धर्मांतर होत आहे, असे ते म्हणाले.केंद्रातील मंत्री विरोधकांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करीत आहेत आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव केला जात आहे. आता तिरंग्याच्या जागी ते भगवा ध्वज आणतील, तो दिवस काही फार दूर नाही’, असे लालूप्रसाद म्हणाले.
‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’
By admin | Updated: January 3, 2015 02:30 IST