शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

‘बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा विरोध’

By admin | Updated: December 21, 2014 02:22 IST

बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे दिली़

कोची : धर्मांतराच्या मुद्यावर संसदेत विरोधकांनी चालवलेली कोंडी आणि त्यामुळे सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर, बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे दिली़ देशात धर्मांतरविरोधी कायद्याची गरज अधोरेखित करतानाच, या कायद्यास स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले़केरळच्या दोनदिवसीय यात्रेच्या समारोपप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते़ बळजबरीने धर्मांतर करण्यास विरोध करणारा भाजपा देशातील एकमेव पक्ष आहे.तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी धर्मांतरविरोधी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे यावे, असे शहा यावेळी म्हणाले़ भाजपा या मुद्यावर अल्पसंख्याक संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे का? असे विचारले असता, या विषयावर राजकीय पक्ष सहमत झाले तरच सार्वजनिक चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले़ उत्तर प्रदेशात एका हिंदुत्ववादी संघटनेच्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाबाबत विचारले असता, हे प्रकरण न्यायालयासमक्ष आहे़ न्यायालय कुठलाही निर्णय देत नाही, तोपर्यंत मी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले़भाजपा देशात जातीय आधारावर फूट पाडू इच्छित आहे, हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप त्यांनी यावेळी धुडकावून लावला़(वृत्तसंस्था)मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, केजरीवाल यांची मागणीनवी दिल्ली : बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी़ जनतेला या मुद्यावरील त्यांची भूमिका कळायला हवी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी येथे केली.