शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भाजपचे ‘मिशन-४00’

By admin | Updated: April 30, 2017 00:56 IST

२0१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन-४00’ ठरविले असून, याअंतर्गत ४00 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली/जम्मू : २0१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन-४00’ ठरविले असून, याअंतर्गत ४00 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, २0१४ च्या निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. विरोधकांनी जिंकलेल्या १२0 जागा आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखली आहे. निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. तथापि, पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केलीआहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच १५ दिवसांचा ‘विस्तार यात्रा’ नावाचा दौरा केला. यात प. बंगाल आणि ओडिशा या राज्यांचा समावेश होता. याशिवाय केरळ, तामिळनाडू या राज्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.शहा यांचे सकाळीच जम्मू विमानतळावर आगमन झाले. विशाल स्कूटर आणि मोटारसायकल रॅलीने त्यांना विश्रामगृहाकडे नेण्यात आले.संपूर्ण जम्मू शहर भाजपचे झेंडे, फुले आणि फलकांनी सजविण्यात आले आहे. भाजप नेते राम लाल, जितेंद्र सिंग, अनिल जैन हे शहा यांच्यासोबत आहेत. शहा हे पक्षाचे आमदार, खासदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नानाजी देशमुख वाचनालय आणि ई-वाचनालय यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्रिकूटनगर येथील पक्ष मुख्यालयात ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करणार आहेत.शहा ९५ दिवसांच्या देशव्यापी दौऱ्यावरविस्तार दौऱ्यानंतर आता अमित शहा यांनी ९५ दिवसांच्या देशव्यापी दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात शनिवारी जम्मूपासून करण्यात आली. पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी भाजप-पीडीपीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.