शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

उत्तराखंडातही भाजपचा लक्षवेधी दिग्विजय

By admin | Updated: March 11, 2017 20:01 IST

उत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते.

सुरेश भटेवराउत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री हरीश रावत हरिदार ग्रामीण आणि किच्छा अशा दोन्ही मतदारसंघात मोठया फरकाने पराभूत झाले. काँग्रेसच्या दारूण पराभवाचे ते बोलके निदर्शक ठरले.

उत्तरप्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक. ७0 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला ४0 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपला यंदा ५७ जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केला नव्हता. तथापि कोणत्याही स्थितीत हे राज्य आपल्या ताब्यात यावे, यासाठी भाजपची व्यूहरचना वर्षभरापासून चालली होती. सुरूवातीला राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसचे आमदार फोडले. त्यानंतर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सारे डावपेच अवलंबले. भाजपचे तीन माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी, भुवनचंद्र खंडुरी, रमेश पोखरीयाल (निशंक) यांची एकत्रित शक्ती बहुदा कमी पडेल, याचा अंदाज येताच वयोवृध्द एन.डी. तिवारी, विजय बहुगुणांसह उत्तराखंडातले सारे माजी मुख्यमंत्री भाजपने आपल्या गोटात दाखल करून घेतले. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज दोन वर्षांपूर्वीच भाजपमधे दाखल झाले होते. भाजपच्या या प्रयत्नांना ते सक्रिय मदत करीत होते. परिणामी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यशपाल आर्य यांच्यासह अनेक काँग्रेसजन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधे दाखल झाले. सर्वांना सन्मानाने प्रवेश देत भाजपने त्यांना उमेदवारीही बहाल केली. उत्तराखंडात आजमितिला बहुतांश जुने काँग्रेसजनच भाजपचे नेतृत्व करीत आहेत. हे सारे जण हरीश रावत यांच्या पराभवासाठी यंदा एकवटले होते.

वर्षभरापूर्वी काँग्रेसचे आमदार फोडून रावत यांचे सरकार उलथवण्याचा भाजपने खटाटोप केला. तथापि सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे भाजपचा हा वांझोटा बेत उधळला गेला. सदर प्रकरणात जनतेची साहानुभूती काही काळ मुख्यमंत्री रावत यांना मिळाली मात्र राज्यात काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरू शकले नाहीत. निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे एकटे हरीश रावतच हाताळत होते. राहुल गांधींच्या काही सभा सोडल्या तर पक्षाचे कोणतेही मोठे नेते रावत यांच्या मदतीला आले नाहीत.भाजपने मात्र केंद्रीय नेत्यांपासून संघाच्या प्रचारकांची मोठी फौज प्रचारासाठी तैनात केली होती. भाजपच्या घवघवीत यशाला हे सारे प्रयोग कारणीभूत ठरले आहेत.

उत्तराखंडात २0१४ साली प्रचंड ढगफुटी झाली. हरिव्दारपासून केदारनाथपर्यंत ठिकठिकाणी प्रचंड नुकसान व मोठी प्राणहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तत्कालिन मुख्यमंत्री विजय बहुगुणा समर्थपणे हाताळू शकले नाहीत. काँग्रेसने मुख्यमंत्रिपद त्यांच्या ऐवजी हरीश रावतांकडे सोपवले. दरम्यान केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे रावत देखील हतबल ठरले. पैशाअभावी इथल्या विकास योजनांना पुरेशी चालना देऊ शकले नाहीत. नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाने दरम्यान डेहराडून ते केदारनाथच्या अतिभव्य आणि मजबूत महामार्गाचे स्वप्न राज्याला दाखवले. हा महामार्ग उत्तराखंडाच्या विकासाची जीवनरेखा ठरणार आहे. राज्यातल्या मतदारांना या प्रकल्पाचे सर्वाधिक आकर्षण वाटले, हे देखील भाजपच्या विजयाचे एक महत्वाचे कारण आहे.

उत्तराखंडात कोणत्याही पक्षाचे सरकार ५वर्षांपेक्षा अधिक काळ टिकले नाही. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली. भाजपला मोठे बहुमत मिळाले आहे. विजयानंतर या पक्षाची जबाबदारी वाढली आहे.