शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम नसल्यास २0१९ मध्ये भाजपाचा पराभव - मायावती; मतदानासाठी मतपत्रिका वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:11 IST

येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.

लखनौ : येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.उत्तर प्रदेशातील काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात भाजपने १६ पैकी १४ महापौरांच्या जागा जिंकल्या आहेत. उरलेल्या दोन जागा बसपाने जिंकल्या. या निवडणुकीत जेथे मतपत्रिकांचा वापर झाला तेथे भाजपला कमी मते पडली असून, ईव्हीएम वापरलेल्या ठिकाणी जास्त मते पडली आहेत, असा आरोप होत आहे. त्याचा संदर्भ देत मायावती यांनी हे वक्तव्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू भदन्त प्रज्ञानंद यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मायावती म्हणाल्या लोकांचा पाठिंबा आहे, देश आपल्या पाठीशी आहे असा भाजपचा दावा असेल, तर त्यांनी ईव्हीएम बाजूला सारून मतपत्रिकांवर मतदान घ्यायला हवे. तसे झाले तर २०१९ भाजपचा पराभव निश्चित आहे, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते.(वृत्तसंस्था)सर्वांची मते मिळालीमायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढविली. आम्हाला दलितांबरोबरच सर्व मागास जाती, सवर्ण जाती, अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम अशी सर्वांची मते मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. अन्यथा आमचे आणखी उमेदवार निवडून आले असते.

टॅग्स :mayawatiमायावती